भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यासह  त्यांच्या आईला कोरोना

0
324

पुणे, दि. 7 (पीसीबी): पुणे शहर कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यासह  त्यांच्या आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्वतः आमदार मुक्ता टिळक यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्याच आठवड्यात मुक्ता टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार सुर आहेत. त्याना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ  यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. भोसरी चे आमदार महेश लांडगे याना कोरोना मुळे रुग्णालयात दाखल केले होते, आता ते घरी विश्रांती घेत आहेत.
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे.  वेळीच उपचार घेतल्याने त्यांनी कोरोनावर रोगावर मात केली होती.