भाजपच्या आढावा बैठकीला आ.शिवाजीराव कर्डिलेंची दांडी

0
408

मुंबई, दि, १५ (पीसीबी) – राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक तोंडावर आल्याने सर्वच पक्षकामाला लागले आहे. राज्यात भाजप खासदार सरोज पांडे घेणार आहेत. त्याची सुरुवात कालपासून (दि,१४) नगरमधून सुरुवात झाली आहे. पांडे यांनी विधानसभा मतदारनिहाय तेथील पदाधिकाऱ्यांकडून सदस्य नोंदणीसह सध्याची राजकीय परिस्थिचाही अंदाज घेण्यात आला आहे. या बैठकीला आ.शिवाजीराव कर्डिले गैरहजर होते.

यावेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आ.स्नेहलता कोल्हे, आ.बाळासाहेब मुरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, अ‍ॅड.अभय आगरकर आदी उपस्थित होते.

राहुरी मतदारसंघाचा आढावा घेत असतांना या मतदारसंघात भाजपाचेच शिवाजीराव कर्डिले हे आमदार असल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी खासदार पांडे यांनी आ. कर्डिले कुठे आहेत? असा सवाल केला. ते नगरमध्ये नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र, कर्डिलेंच्या अनुपस्थितीची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.