Desh

भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात; कमलनाथ यांचा दावा  

By PCB Author

September 17, 2018

इंदोर, दि. १७ (पीसीबी) – मध्यप्रदेशमधील सत्तारूढ भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, असा दावा मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी आज (सोमवार) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

कमलनाथ यांनी इंदोर येथे पदयात्रा काढून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे. तसेच राज्यातील २ हजारपेक्षा जास्त उमदेवार तिकीटासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात एकूण २३० विधान सभेच्या जागा आहेत. त्यासाठी २ हजार ५०० जणांनी उमेदवारीसाठी  दावा केला आहे. यात ३० भाजप आमदारांचा समावेश असल्याचा दावा करून ते माझ्या संपर्कात आहेत. मात्र, त्याबाबत मा काही जास्त बोलू शकत नसल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.