भाजपचे राजकारण म्हणजे भगदाड पाडणे – प्रकाश आंबेडकर

0
359

बीड, दि. १४ (पीसीबी) – भाजपचे राजकारण म्हणजे भगदाड पाडणे, समाजात भांडणे लावून, स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रकार  आहे. भाजपच्या राजकारणात पक्ष हिता असून  देशहित नाही, असा  आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  आयोजित जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. यावेळी बीडचे उमेदवार अशोक हिंगे,  गेवराईचे विष्णु देवकते, केजचे वैभव, माजलगावचे धम्मानंद साळवे, परळीचे भीमराव सातपुते, आष्टीचे नामदेव सानप, शिवराज बांगर, प्रेम चांदणे उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले की, धनगर आरक्षणाचे नुसते आश्वासन देऊन समाजाला खेळवत ठेवले. १०० कोटी रुपयांपासून  ५०० कोटी रुपयांपर्यंत संपत्ती असलेल्या ३३ हजार कुटुंबांनी भीतीपोटी देश सोडला आहे, असा  आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  मुस्लिमांना बदनाम करुन सत्ता लाटण्याचा प्रयत्न होत आहे. प्रस्थापित राजकारण संपविण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.