भाजपचे माजी आमदार विजय घोटमारेंचा राष्ट्रवादीत प्रवेश   

0
692

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – विदर्भातील हिंगणा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विजय घोटमारे  यांनी  आज (शनिवार)  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला .  त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

विजय घोटमारे म्हणाले की, यापुढे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर टाकेल, ती मी प्रामाणिकपणाने निभावेल.  तर जनतेचा आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान,  काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते, कार्यकर्ते  भाजप –शिवसेनेत प्रवेश करत आहेत . तर दुसरीकडे विजय घोटमारे  यांनी  भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  त्यामुळे  राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.