भाजपचे माजी आमदार  नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

0
364
मुंबई, दि.२८ (पीसीबी) – भाजपचे माजी आमदार  नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीची  दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पीडित नगरसेविकेनं केली होती. ‘मेहता यांच्याशी माझं लग्नही झालं असून त्यांच्यापासून मला एक मुलगाही आहे. १९९९ पासून ते २०२० पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझं लैंगिक शोषण केले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी माझा वापरही करून घेतला होता. माझ्याप्रमाणेच मेहता यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, असा आरोप तिनं केला आहे. याबाबत पीडित नगरसेविकेने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडंही तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्यांचे म्हणणे होते. पक्षाकडून न्याय न मिळल्याने अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली होती. तशी तक्रारही त्यांनी कोकण महानिरीक्षकांकडे केली होती. त्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.