भाजपचे नेते प्रसाद लाड अजित पवारांच्या भेटीला; पुण्यात अर्धा तास चर्चा

0
296

पुणे,दि.१७(पीसीबी) – आज (शुक्रवार१७) भाजपचे बडे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. भाजपचा बडा नेता पुन्हा एकदा अजित पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार आज पुण्यातील सर्वच विषयांवर सकाळपासून बैठका घेत आहेत. यावेळी प्रसाद लाड हे सुद्धा पुण्यात येऊन त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. प्रसाद लाड आणि अजित पवार यांची सर्किट हाऊस इथं भेट झाली. या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली.

प्रसाद लाड यांनी अजित पवारांची भेट नेमकी का घेतली, याबाबतचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या भेटीनंतर बाहेर आलेल्या प्रसाद लाड यांना माध्यमांनी भेटीबाबत विचारलं असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.