भाजपचे काही मंत्री आणि आमदार काँग्रेसच्या संपर्कात; नाना पटोलेंचा दावा

0
346

गोंदिया, दि. २२ (पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी  खळबळजनक दावा केला आहे. भाजपचे काही मंत्री आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सुचक विधान  नाना पटोले यांनी केले आहे.

गोंदियामध्ये पटोले पत्रकारांशी बोलताना होते. यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  भाजपचे काही नेते आघाडीतील आमदार  आमच्या संपर्कात आहेत,   असा दावा  करत आहेत.  मात्र,  आता काँग्रेसच भाजपला जोर का झटका ,धीरेसे देण्याच्या तयारीत आहे, असे पटोले म्हणाले.

भाजपचे संपर्कात असलेले आमदार आणि मंत्री लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे पटोले यांनी  सांगितले आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी भाजपचे कोणते मंत्री आणि आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, याबाबत  भाष्य करणे टाळले.