भाजपचे आमदार जुगल किशोर बागरी यांचे कोरोनामुळे निधन

0
933

मध्य प्रदेश, दि.११ (पीसीबी) : मध्य प्रदेशातील रायगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि माजी मंत्री जुगल किशोर बागरी यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यवरती भोपाळच्या व्हिवा रुग्णालयात दाखल केले.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी बाग्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले कि, ‘मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रायगाव विधानसभा येथून आमदार आणि माजी मंत्री श्री. जुगल किशोर बागरी यांच्या निधनाची बातमी कळली. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. देव बागरी यांना आपल्या चरणी स्थान देवो. आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना देवो.