भाजपची विधानसभेची तयारी; शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार 

0
414

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांच्या  निकालाआधीच भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे  दिसत आहे.  फडणवीस सरकार लवकरच  राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत  विचार करत  आहे,  अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

राज्य सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती प्रत्येक  जिल्ह्यातून मागविण्यास सुरूवात केली आहे.  मार्च २०१६-१७ ते२०१८  पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना  कर्जमाफी देऊन त्यांना मोठा दिलासा देण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील ४३ लाख ३५  हजार शेतकऱ्यांना १८ हजार २३५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात विकास यात्रा काढून जनतेशी संवादही साधणार आहेत.  त्याचबरोबर दुष्काळासंदर्भातील मदत सर्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले आहेत. दोन वर्षांपासून जशी लोकसभेची तयारी सुरु केली. त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे.