Maharashtra

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर; महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची घोषणा

By PCB Author

March 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) –  भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली असून १४ विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

भाजप महाराष्ट्रात २५ जागा लढवणार आहे. भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकर राव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या १४ जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

नंदुरबार – हीना गावित

धुळे –  सुभाष भामरे

रावेर- रक्षा खडसे

अकोला – संजय धोत्रे

वर्धा – रामदास तडस

नागपूर – नितीन गडकरी

गडचिरोली-चिमुर – अशोक नेते

चंद्रपूर- हंसराज अहिर

जालना – रावसाहेब दानवे

भिवंडी – कपिल पाटील

मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी

मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन

अहमदनगर – सुजय विखे पाटील

बीड – डॉ. प्रीतम मुंडे

लातूर – सुधाकरराव शृंगारे

सांगली – संजयकाका पाटील