भाजपचा शिवसेनेला धक्का; रत्नागिरीतील माजी आमदाराने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
387

रत्नागिरी, दि. १८ (पीसीबी) – शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी  भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  भाजपची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आली होती. त्यावेळी  सूर्यकांत दळवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेतली.  त्यामुळे  दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत  सूर्यकांत दळवी यांनी सांगितले की, माझ्यावरील अन्याय मी मुख्यमंत्र्यांना सांगितला.  शिवसेना पक्षाने माझी दखल घेतली नाही.  तर मला भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

सूर्यकांत दळवी दापोलीचे माजी आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर बुवाबाजीचा आरोप केला होता. रामदास कदम  जादूटोणा करणाऱ्या बुवांना सोबत घेऊन फिरतात. कदम यांना विरोधी पक्षनेता होण्यासाठी देखील आमच्यासोबत भगत दिला होता. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, असा दावा दळवी यांनी केला होता.

लोकसभा निवडणुकीत सुर्यकांत दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी शिवसेनेते असले तरी,  त्यांच्यामध्ये मोठे मतभेद आहेत. त्यांच्यातील धूसफूस  निवडणुकीच्या तोंडावर समोर आली आहे.