भाजपचा उमेदवारच म्हणतोय, “यंदाची निवडणूक कठीण, विजयाची शाश्वती नाही”

0
603

मुरादाबाद, दि. १७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. देशभरात विविध पक्षाने नेते सभा, भाषणे, दौऱ्यांच्या माध्यमातून निवडुण येण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. भाजपा असो किंवा काँग्रेस सर्वच बड्या पक्षांचे नेते विविध ठिकाणी सभा घेऊन आपल्या पक्षातील उमेदवारांना मत देण्याची विनंती मतदारांना करता दिसत आहेत. भाजपाला पुन्हा एकदा सत्तेत आम्हीच येऊ असा विश्वास वाटत असला तरी भाजपाच्या एका उमेदवाराला आपला पराभव दिसत आहे. मुराबादामधील भाजपाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी मुराबादची जागा जिंकणे कठीण असून विजयाची शाश्वती नसल्याचे मत एका सभेत बोलताना व्यक्त केले आहे.

सध्या मुराबादचे विद्यामान खासदार असणारे सर्वेश कुमार सिंह यांना यंदा विजयाची शक्यता कमी वाटत आहे. मुराबादामध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच २३ मे रोजी मतदान होणार आहे. एकीकडे भाजपाचे उमेदवार विजयासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत असतानाच सर्वेश कुमार यांनी मतदानाआधीच ही जागा जिंकणे टिकवणे कठीण असल्याचे म्हटले आहे. ‘यंदा सर्व मुस्लीम मतदार एकत्र आल्याने विजयीबद्दल खात्री वाटत नाही. मुस्लीमांची एकगठ्ठा मते एकाच पक्षाला मिळतील. ही निवडणुक काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी झाली आहे,’ असे मत त्यांनी पीटीआयशी बोलताना नोंदवले.

मुरादाबादमधून काँग्रेसने सर्वेश कुमार यांच्याविरोधात इमरान प्रतापगढी यांना मैदानात उतरवले असून ते आपल्या कविता आणि भाषणांच्या माध्यमातून भाजपा सरकारवर टिका करण्यासाठी स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहेत. सपा-बसपा-राजद गठबंधननेही येथे एस. टी. हसन या मुस्लीम चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. मुराबाद मतदारसंघामध्ये एकूण १९ लाख ४१ हजार मतदार असून त्यापैकी ४७ टक्के मतदार मुस्लीम आहेत. पाच वेळा आमदार राहिलेले सर्वेश कुमार २०१४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले.

१९५२ पासून झालेल्या १७ निवडणुकांमध्ये मुराबादामध्ये ११ वेळा मुस्लीम उमेदवार निवडुण आले आहेत. भारतीय जनसंघ पक्षाने दोनदा या जागेवर विजय मिळवला होता तर २०१४ मध्ये पहिल्यांदा भाजपाला या जागेवर विजय मिळण्यात यश आले होते. इतर दोन उमेदवारांमध्ये मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याने सर्वेश कुमार यांचा विजय सोप्पा झाला होता.