Maharashtra

भाजपचाच नाही, तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस

By PCB Author

July 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – भाजप शिवसेना युतीत कोणत्याही पदावरुन  वाद नाही, असा दावा करून  मी एकट्या भाजपचाच नाही, तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे म्हटले आहे.

मुंबईत आयोजित  भाजप कार्यकारिणीच्या  बैठकीत  मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते  म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या वादात आपल्याला पडण्याचे कोणतेही कारण नाही. मुख्यमंत्री हा जनता निवडत असते. आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणाऱ्या लोकांची कमी नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन.

फडणवीस म्हणाले की, मी आधीच सांगितले की,   मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता?  मी केवळ भाजपचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे. आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामसह सर्व मित्रपक्षांचा मुख्यमंत्रीदेखील मीच आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आम्ही युतीतच लढणार आहोत. याबाबत कार्यकर्त्यांच्या मनता कोणताही संभ्रम नको.  कोणतीही जागा आपण गमावणार नाही. युतीतील जागावाटपात कोणतीही जागा आपल्याकडे येऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.