भाजपकडून माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभा लढवणार ?

0
3381

पुणे, दि. ५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून प्रसिध्द अभिनेत्री ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितला  भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने देशव्यापी सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार सेलिब्रेटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची ऱणनीती भाजपने आखल्याची माहिती मिळत आहे.   

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रेटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. माधुरी दीक्षितलाही पुण्यातून भाजपकडून तिकीट  दिले जाणार असल्याचे समजते. पुणे   लोकसभा मतदारसंघातून सध्या भाजपचे खासदार अनिल शिरोळे  प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे माधुरीला या मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होणार आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जून महिन्यात ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियाना अंतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली होती.  त्यावेळी शहा यांनी माधुरीला  राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. आता माधुरीला पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेला भाजपच्या सूत्रांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.