Maharashtra

भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता?

By PCB Author

February 15, 2020

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे   यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा  रंगत आहे. राज्य भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची  अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्या जागा भरण्यासाठी विविध पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळाचा मोठा आकडा असल्याने काही उमेदवारांना त्यांना विधान परिषदेवर सहज पाठवता येणार आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे.