Desh

भाजपकडून आमदार फोडण्यासाठी २ कोटी रुपयांची ऑफर

By PCB Author

July 22, 2019

मुंबई, दि, २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकात भाजपला भरभरुन यश मिळाल्याने सध्या भाजपात राजकारण्यान अच्छे दिन दिसत असल्याने रोज कुठला ना कुठल आमदार खासदार भाजपात प्रवेश करत आहे. संपूर्ण देशात भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच आमदारांना फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये व पेट्रोलपंप देण्याची लालूच भाजपकडून दाखविली जात आहे असंही बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना बॅनर्जी यांनी यंदाची लोकसभा निवडणूक भाजपने लबाडीने जिंकली आहे. त्यासाठी या पक्षाने ईव्हीएम, सीआरपीए, निवडणूक आयोगाचा वापर केला अस विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आता आमदारांना फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये व पेट्रोलपंप देण्याची लालूच भाजपकडून दाखविली जात आहे असंही आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. दरम्यान, कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार असल्याचही त्या म्हणाल्या. तसेच कॉंग्रेसकडूनही भाजपने पैशाच्या जोरावर आमदार फोडल्याचा आरोप भाजपवर केला आहे.