Bhosari

भाचीसोबत चायनीज आणण्यासाठी जाणा-या मामाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण

By PCB Author

April 13, 2021

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – भाचीसोबत चायनीज आणण्यासाठी जात असलेल्या मालाला नऊ जणांच्या टोळक्याने अडवून सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. त्यात मामा जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास बालाजीनगर, भोसरी येथे घडली. कृष्णा गणेश भोसले असे जखमीचे नाव आहे. याबाबत जखमी कृष्णा यांची बहिण सोनाली गणेश भोसले (वय 25, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुन्ना कानडे, अक्षय इंदले, काळ्या चंदनशिवे, निखील कानडे, प्रथम लोंदके, प्रेम काळे, रोहन खंडागळे, रोहन गायकवाड, अवि गायकवाड (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लहान मुलीला चायनीज आणण्यासाठी त्यांचा भाऊ कृष्णा यांच्यासोबत पाठवले. चायनीज आणण्यासाठी जात असताना भिमरत्न प्रतिष्ठान कमान येथे आरोपींनी कृष्णा यांना अडवले. विनाकारण मारहाण करून आरोपी प्रेम काळे याने कृष्णा यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.