Maharashtra

भर रस्त्यात गोळीबार करुन तरुणाची आत्महत्या

By PCB Author

October 30, 2018

पेण, दि. ३० (पीसीबी) – पेणमधील पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ एका कारमध्ये २५ वर्षीय तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी समोर आली. या घटनेपूर्वी मयत तरुणाने सोमवारी (दि.२९) रात्री उशीरा पारिजात सोसायटी परिसरात भररस्त्यात गोळीबार केल्याची माहिती आहे.

तेजस फडके (वय २५, रा. पनवेल) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पारिजात सोसायटी परिसरातील कारमेल शाळेजवळ तेजस याने मद्यधूंद अवस्थेत गोळीबार केला. त्यानंतर तिथून पळून गेल्यावर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पेणमधील पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ एका कारमध्ये सापडला. या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तेजस तिथे काय करत होता, त्याने गोळीबार कोणावर केला, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. पेन पोलीस अधिक तपास करत आहेत.