भर दिवसा लॅपटॉपसह दुचाकी चोरीला

0
304

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप आणि दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 26) दुपारी एक वाजताच्या सुमारास स्वप्ननगरी सोसायटी, उद्यमनगर, पिंपरी येथे घडली आहे.

कमल राजेंद्रप्रसाद गुप्ता (वय 37, रा. स्वप्ननगरी सोसायटी, उद्यमनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली 25 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / आर 1457) उद्यमनगर पिंपरी येथील स्वप्ननगरी सोसायटीमध्ये शशी मेडिकलसमोर पार्क केली. दुचाकीच्या डिक्कीमध्ये फिर्यादी यांचा 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप होता. अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉपसह दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.