भर दिवसा चोरट्यांचा सुळसुळाट; पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले आणि……

0
426

दिघी, दि. २८ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र एका तरुणाने जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर तो तरुण त्याच्या दोन साथीदारांसोबत दुचाकीवरून पळून गेला. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास अंजना डेरी समोर दिघी येथे घडली.

मनीषा नवनाथ डफळ (वय 42, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा त्यांच्या मैत्रिणीसोबत मंगळवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथून रस्त्याने पायी जात होत्या. त्या अंजना डेअरीच्या समोर आल्या असता त्यांच्या पाठीमागून चालत आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील 44 हजार दोनशे रुपये किमतीचे एक तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर मंगळसूत्र हिसकावणारा तरुण पुढे जाऊन त्याच्या दोन साथीदारांसोबत दुचाकीवरून पळून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.