Others

भर दिवसा कोयता घेऊन दहशत निर्माण करणा-या तरुणास अटक

By PCB Author

November 02, 2021

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – एका तरुणाने हातात कोयता घेऊन तो हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार सोमवारी (दि. 1) दुपारी चार वाजता चिंचवड येथे घडला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सोन्या परशुराम कांबळे (वय 24, रा. बिजलीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोमवारी दुपारी चार वाजता फिर्यादी यांच्या घरासमोर कोयता घेऊन विनाकारण आरडाओरडा व शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांच्या आईने आरोपीला विचारणा केली. त्यावरून त्याने फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या वडिलांना देखील शिवीगाळ केली. कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करून आरोपी निघून गेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.