भर दिवसा उघड्या दरवाजावाटे चोरी; दागिने, मोबईल चोरीला

0
243

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : एका अनोळखी मुलीने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून 79 हजारांचे दागिने, मोबईल फोन, कागदपत्रे आणि पर्स चोरून नेली. हे घटना 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

साजिद शरफुद्दीन मखदूम (वय 51, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 13) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादी मखदूम यांचे घर उघडे होते. उघड्या दरवाजावाटे एका अनोळखी मुलीने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने, एक मोबईल फोन, कागदपत्रे, एक पेनड्राईव असलेली पर्स असा एकूण 79 हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.