भरसभेत राहुल गांधीचे महिलेने घेतले चुंबन

0
440

अहमदाबाद, दि. १४ (पीसीबी) – गुजरातमधील वलसाड येथील एका  सभेच्या व्यासपीठावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एका महिलेने अचानक चुंबन घेतले. या प्रकारामुळे राहुल  यांना काय करावे, हेच सूचत नव्हते. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

राहुल यांचे  व्यासपीठावर  आगमन झाल्यानंतर  ध्वनीक्षेपकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी महिलांचा एक गट व्यासपीठावर आला. महिला आपल्या स्वागताला येत आहेत हे पाहून राहुल त्यांचा मान राखण्यासाठी उठून उभे राहिले. त्याचवेळी सर्वात पुढे असलेल्या महिलेने राहुल यांच्या गालावर चुंबन घेतले. राहुल यांनी स्मित केले. त्यानंतर महिलांनी राहुल यांच्या गळ्यात पुष्पमाला घातली.