Pimpri

भरलेल्या मालासह टेम्पो घेऊन चोरट्यांनी केला पोबारा

By PCB Author

June 29, 2021

तळवडे, दि. २९ (पीसीबी) – माल भरून घराजवळ पार्क केलेला टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी गणेशनगर, तळवडे येथे उघडकीस आली.

किशोर दत्तात्रय भराटे (वय 31, रा. गणेशनगर, तळवडे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भराटे हे टेम्पो चालक आहेत. त्यांच्या टेम्पो मध्ये 2 हजार 200 किलो वजनाचा लोखंडी माल भरला होता. मिल भरलेला टेम्पो रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांच्या घराजवळ पार्क केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी नऊ लाख रुपये किमतीचा टेम्पो, तसेच दोन लाख 22 हजार 600 रुपये किमतीचा टेम्पोत असलेला माल चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.