Pimpri

भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By PCB Author

January 11, 2022

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणा-या इको कारने समोरून येणा-या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजता भांबोली फाटा येथे घडला.

दत्तात्रय नामदेव घावटे (वय 21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम मंगलदार गाडेकर (वय 22) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नामदेव सावळेराम पडवळ (वय 36, रा. शेलू, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / जी वाय 8793 या क्रमांकाच्या इको कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा मयत दत्तात्रय आणि त्याचा मित्र शुभम असे दोघेजण मोपेड दुचाकीवरून भांबोली फाटा येथून जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात एक इको कार आली. कार वरील आरोपी चालकाने हायगयीने कार चालवून दत्तात्रय यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दत्तात्रय गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र शुभम हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. आरोपी कार चालक अपघाताची माहिती न देता अपघाताच्या ठिकाणी न थांबता पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे तपास करीत आहेत.