Pimpri

भरदिवसा घरातून दहा हजारांचा ऐवज लंपास

By PCB Author

December 31, 2020

तळेगाव दाभाडे, दि.31 (पीसीबी) : अज्ञात चोरट्यांनी योजना नगर, तळेगाव दाभाडे येथे एका घरात चोरी करत एक एलईडी टीव्ही आणि दोन रिमोट चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आली आहे.

चंद्रशेखर माधव संत (वय 58, रा. योजना नगर, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी (दि. 27) सकाळी दहा ते बुधवारी (दि. 30) सकाळी नऊ या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून 10 हजार रुपये किमतीचे एक एलईडी टीव्ही आणि दोन रिमोट असा एकूण 10 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.