भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत

0
2014

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात एका तरुणीचा समावेश असून भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून तब्बल लाखो रुपये उकळले होते, अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.

भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी यांनी आरोप केला होता की विनायक दुधाळे, शरद देशमुख हे दोघे एका तरुणीच्या मदतीने भय्यू महाराज यांना ब्लॅकमेल करत होते. या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी या दिशेने तपास सुरु केला आणि शेवटी या तिघांना अटक करण्यात आली.