भय्यू महाराजांवर मध्य प्रदेश सरकारचा दबाव होता – करणी सेना

0
799

इंदूर, दि. १९ (पीसीबी) – अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्यावर मध्य प्रदेश सरकारचा दबाव होता. भय्यूजी यांच्याकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्ताऐवज होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर दबाव आणल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा गौप्यस्फोट राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने केला आहे. तरी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची अशी मागणी करणी सेनेने केली आहे. करणी सेनेच्या या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी म्हणाले की, भय्यूजींकडे नर्मदा घोटाळ्याचे कागदपत्रे होती. त्यांनी ही कागदपत्रे जाहीर करू नये, म्हणून सरकारने त्यांच्यावर दबाव आणला होता. याबाबतची माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांकडून मिळाल्याचे गोगामेडी यांनी सांगितले.

सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. त्यामुळे सत्यबाहेर पडेल. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही, तर करणी सेना आंदोलन करेन,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भय्यू महाराज यांच्या हत्येत त्यांच्या कुटुंबियांचा, शिष्यांचा किंवा सरकारशी संबंधित व्यक्तिचा हात असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.