भयमुक्त व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार- संदीप बिष्णोई

0
568

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) – भयमुक्त व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार असल्याचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त आर.के पद्मनाभन यांच्याकडून नवनिर्वाचित पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (शुक्रवारी) पदभार स्विकारला. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती १५ ऑगस्ट २०१८ साली करण्यात आली होती. आर.के. पद्मनाभन यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयात पहिले आयुक्त बनण्याचा मान मिळाला होता.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संदीप बिष्णोई यांची नियुक्ती झाल्याने चर्चेला उधाण आल्याने त्यांच्या कामगिरीकडे शहरवासीयांचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच नागरिकांना शहर सुरक्षित वाटावे यासाठी कष्ट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले