भयंकर किंमत जगाला मोजावी लागणार – नितीन गडकरी

0
403
मुंबई, दि.२९ (पीसीबी) – सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. ‘समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून नव्या पिढीपर्यंत समग्र सावरकर पोहोचवावेत,’ असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.’
गडकरी म्हणाले, ‘प्रखर राष्ट्रवाद व सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही विसरलो तर त्याची भयंकर किंमत देशालाच नव्हे तर जगाला मोजावी लागेल आणि भविष्यही अंधारलेले असेल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पाच हजार वर्षांत मशीद तोडणारा व तलवारीच्या बळावर जबरदस्तीने धर्मांतरे करणारा एकही हिंदू राजा झाला नाही असे मत त्यांनी यावेळी बोलताना येथे मांडले. सहिष्णू व उदारमतवादी भारतीय संस्कृती ही ‘फक्त आम्ही चांगले, बाकी सारे काफीर’ या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असे त्यांनी सांगितले. ‘सामाजिक सुधारणांचा आग्रह व जातीयतेच्या प्रथेचा नाश आदींबाबत सावरकरांनी खूप आधीच भूमिका घेतल्या होत्या, असे मत नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना मांडले.