भगवी वस्त्र परिधान करुन मंदिरांमध्ये बलात्कार केले जातात; दिग्विजय सिंगांचे वादग्रस्त विधान

0
748

भोपाळ, दि.१७ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेण्याची आपली ओळख कायम ठेवली आहे. भगवी वस्त्र परिधान करुन देशातील मंदिरांमध्ये बलात्कार  केले जातात. ज्यांनी आपल्या सनातन हिंदू धर्माची अशा कृत्यांमुळे बदनामी केली आहे, असे सिंग यांनी म्हटले आहे. या विधानामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

भोपाळमध्ये एका कार्यक्रमात  दिग्विजय सिंग बोलताना म्हणाले की,  एखादा माणूस आपले कुटुंब सोडून साधू होतो, धर्माचे आचरण करत अध्यात्माकडे वळतो. मात्र आजच्या घडीला भगवी वस्त्र परिधान करुन काही लोक चूर्णही विकतात. या सगळ्यामुळे सनातन धर्माची बदनामी होते आहे.

भगवी वस्त्र परिधान लोक चूर्ण विकतात, भगवी वस्त्र परिधान करुन मंदिरांमध्ये बलात्कार केले जात आहेत. हाच आपला सनातन हिंदू धर्म आहे का? जे अशा पद्धतीने सनातन धर्माची बदनामी करत आहेत त्यांना देव कधीही क्षमा करणार नाही,  असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. या विधानामुळे  नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.