भंडाऱ्याच्या हलगर्जीपणाच्या चौकशीची फडणवीसांची मागणी, पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक

0
336

अकोला, दि.8 (पीसीबी) : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्यांनतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत त्याची तत्काळ चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केली आहे. तसेच बालकं दगावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाईचीही त्यांनी मागणी केलीये.

भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खदायक आणि व्यथित करणारी आहे. या घटेनमध्ये बळी ठरलेल्या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या घटनेची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा भंडार जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी बाळं दगावलेल्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत जखमी झालेले बलकं लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.
रुग्णालयातील या आगीमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेची दखल घेतली आहे. भंडारा जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत विदारक असून बाळ गमावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.