भंडारा-गोंदियाचे राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे उमेदवार; विद्यमान खासदाराचा पत्ता कट

0
511

भंडारा-गोंदिया , दि. २५ (पीसीबी) – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट झाला आहे.

भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे २८ मे रोजी पोटनिवडणुकीसाठी इथे मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली. ज्यात राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव केला. नाना पटोले भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकले. परंतु भाजपच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत ८ डिसेंबर २०१७ रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

२००४ साली भंडारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर  २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते शेवटचे सहा महिने शिक्षण राज्यमंत्री होते.

नाना पंचबुद्धे हे भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी गावातील रहिवासी असून याच क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. जिल्हापरिषद सदस्य ते आमदार असा नाना पंचबुद्धे यांचा प्रवास आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले होते. त्याच काळात ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते.