भंडारा अग्नितांडव प्रकरण: “कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात?”; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला परखड सवाल

0
231

मुंबई, दि.१० (पीसीबी) : शनिवारच्या मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने अचानक घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या भयंकर अग्नितांडवात दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये घडलेल्या या घटनेत तीन बालकांचा आगीमुळे तर सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध गोष्टींचा उलगडा होत असतानाच भाजपाचे नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे सरकारला प्रश्न केला आहे.

राम कदम यांनी ट्विट करत सवाल केला आहे कि,“भंडारा येथील १० चिमुकल्या बाळाच्या हत्येनंतर काही संतापजनक माहिती समोर येते आहे. हे प्रकरण लवकर थंड व्हावे आणि गुलदस्त्यात जावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. निष्पाप मृत तान्ह्या बाळांच्या आई वडिलांना आज मीडियाशी बोलू नका म्हणून धमकावले जात आहे? कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात?”, असा परखड प्रश्न राम कदम यांनी विचारला. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये महाविकास आघाडीचा हॅशटॅगही वापरला आहे.

“भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मन सुन्न झाले. अशी हानी पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्र fire extinguisher पाहिजे आणि ते कसे वापरावे याचं प्रशिक्षण तिथल्या nursing व इतर staff ला दिले गेले पाहिजे”. दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी उद्धव ठाकरे सरकारकडे अशी मागणी केली.