Desh

ब्रिटनहन आलेल्यांपैकी अद्याप १५ प्रवाशांचा तपास नाही

By PCB Author

December 26, 2020

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – युनायटेड किंगडम (यूके) मधून आलेल्या ११५ प्रवाशांपैकी सर्वांचाच ठावठिकाणी लागला असून त्यापैकी १५ प्रवासी पिंपरी चिंचवड शहाराबाहेर निघून गेले आहेत. १५ प्रवाशांचे पत्ते अपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापर्यंत अजुन पोहोचता आलेले नाही, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

आजवर एकूण ८५ प्रवाशांचे आरटीपीसीआर तपासणी केली आहे. त्यापैकी ७० अहवाल नकारात्मक आले तर, एका प्रवाशाचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित १५ अहवाल अजून येणे बाकी आहे, असेही डॉ. साळवे यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरात २२२ पॉझिटिव्ह –

पुणे शहरातील कोरोना प्रसार आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. दिवसभरात २२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे तर, दिवसभरात ४१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात करोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ४ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. ३८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २२९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १,७७,५८० तर, ॲक्टिव्ह रुग्ण ४,२८४ आहे. एकूण मृत्यू ४,६०४ आणि आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज १,६८,६९२ आहेत. आज २,८०१ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.