बोपखेल येथे कंपनीच्या आवारातून 18 लाख 62 हजारांचा ऐवज चोरीला

0
345

बोपखेल, दि. ६ (पीसीबी) – बोपखेल येथे एसटी टेलिमीडिया ग्लोबल डेटा सेंटर्स इंदिरा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी 18 लाख 62 हजार 257 रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना १० जून रोजी रात्री साडेअकरा ते ११ जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

संजय रामचंद्र जाधव (वय 44, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपखेल येथे एसटी टेलिमीडिया ग्लोबल डेटा सेंटर्स इंदिरा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनीच्या आवारात ठेवलेल्या कंटेनरचे कुलूप तोडून चोरट्याने इलेक्ट्रिक कामासाठी लागणारे अल्युमिनियम, कॉपर व त्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे सामान असा एकूण 18 लाख 62 हजार 257 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

गेलेल्या सामानाची खात्री करून त्यानंतर गुन्हा दाखवळ करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करीत आहेत.