Maharashtra

बॉलीवूडमधील ही जोडी का ठरत आहे कौतुकास पात्र..?? जाणून घेऊयात…..

By PCB Author

July 02, 2020

मुंबई, दि.२(पीसीबी) : ‘डॉक्टर्स डे’च निमित्त साधत बॉलीवूडमधील या प्रसिद्ध जोडीने एक मोठा निर्णय घेतला आहे जो सगळीकडे कौतुकाचा विषय ठरत आहे….कारण, या जोडीने ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हि प्रसिद्ध जोडी दुसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख आहे.

आपल्या सोशल साईट वरती दोघांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी हि बातमी आपल्या फॅन्सला दिली. या दोघांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. पण ते शक्य होत नव्हतं. पण आता आम्ही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयवदान करणं या पेक्षा मोठं गिफ्ट कोणासाठी काय असू शकतं आणि आपण मरणोत्तर अवयवदान करून कोणाला तरी जीवदान देऊ अशी प्रतिज्ञा करा.” असं सांगत त्यांनी लोकांना सुद्धा मरणोत्तर अवयवदान करण्याचं आवाहन केलं आहे.

डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI यांचे दोघांनीही आभार मानले,कारण हा निर्णय घेण्यासाठी यांनीच आम्हाला प्रोत्साहित केलयं, असं रितेश आणि जेनेलिया म्हणाले .

There is no greater gift to someone than ‘The Gift Of Life’. @genelia & me have pledged to donate our organs. We urge you all to join this great cause and be part of ‘The Life AfterLife’. pic.twitter.com/dq4flMSxT6

— Riteish Deshmukh (@Riteishd) July 1, 2020