Entertainment

बॉलीवूडचा ‘व्हिलन’ ठरतोय रिअल आयुष्यात ‘हिरो’; अभिनेता सोनू सूदचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल

By PCB Author

September 13, 2020

मुंबई, दि.१३(पीसीबी) : करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांचं जीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत चालली असून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होत आहेत.परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी गरीबांसाठी मदतीचा हात पुढे करत गरीब विद्यार्थांसाठी आता एका स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

हमारा भविष्य हमारी काबिलियत और मेहनत तय करेगी ! हम कहाँ से हैं , हमारी आर्थिक स्थिति का इस से कोई सम्बन्ध नहीं। मेरी एक कोशिश इस तरफ – स्कूल के बाद की पढ़ाई के लिए full scholarship – ताकि आप आगे बढ़ें और देश की तरक्की में योगदान दें। 🇮🇳
email करें scholarships@sonusood.me pic.twitter.com/tKwIhuHQ5j

— sonu sood (@SonuSood) September 12, 2020

सोनू सूद यांनी ट्विट करत याबाबदल माहिती दिली. “आपलं भविष्य हे कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ठरतं. आपल्या आर्थिक परिस्थितीशी त्याचा काहीही संबंध नसतो. ज्या गरीब विद्यार्थांना शिकण्याची इच्छा आहे पण आर्थिक टंचाईमुळे त्यांना शिकता येत नाही. अशा विद्यार्थांसाठी आम्ही एक स्कॉलरशीप सुरु करत आहोत. कारण विद्यार्थांच्या प्रगतीमध्येच देशाची प्रगती असते. स्कॉलरशीप मिळवण्यासाठी scholarships@sonusood.me या इमेल आयडीवर मेल करा.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनू सूदने या नव्या स्कॉलरशीपची घोषणा केली आहे.

Hindustaan Badhega Tabhi, Jab Padhenge Sabhi!
Launching full scholarships for students for higher education.I believe,financial challenges should not stop any one from reaching their goals.Send in ur entries at scholarships@sonusood.me (in next 10 days) & I will reach out to u🇮🇳 pic.twitter.com/JPBuUUF23s

— sonu sood (@SonuSood) September 12, 2020

सोनू सूदने याआधी सुद्धा कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन देत माणुसकीचा हात पुढे केला होता.