Entertainment

बॉलीवूडचा आणखी एक तारा निखळला; चांदनी, दीवाना चित्रपटाचे कथाकार सागर सरहदी काळाच्या पडद्याआड

By PCB Author

March 22, 2021

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : नूरी, बाजार, कभी कभी, सिलसिला, चांदनी, दीवाना आणि कहो प्यार प्यार है, असे छ्त्रपती ज्यांच्या लेखणीने गाजले. ते प्रसिद्ध हरहुन्नरी ज्येष्ठ लेखक आणि चित्रपट निर्माते सागर सरहदी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी आपल्या मुंबईच्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते.

अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कार्डियाक केअर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते , त्यांना हृदयासंबंधित त्रास होत होता. याआधी 2018 मध्ये त्यांना एक हृदयविकाराचा झटका सुद्धा आला होता. सागर सरहदींची हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कथाकारांमध्ये गणना केली जाते. कभी कभी, सिलसिला आणि दिवाना या चित्रपटासह त्यांनी अनेक हिट चित्रपट त्यांनी चित्रपट सृष्टीला दिले. ‘बाजार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या चित्रपटात स्मिता पाटील, फारुख शेख आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला समीक्षकांकडूनच काय प्रेक्षकांकडून सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला होता.