बॉलिवूड कोरनाग्रस्त…आमीर खानच्या घरात कोरोनाची एन्ट्री

0
312

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : कोरोना व्हायरसच्या विळख्यात बॉलिवूडही अडकत चाललं आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता आमीर खानच्या टीममधील 7 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमीर खानच्या टीममधील 7 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये आमीर खानचा एक ड्रायव्हर, दोन सुरक्षा रक्षक आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

आमीर खानने एबीपी न्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, ‘माझ्या स्टाफमधील काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांना लगेच क्वॉरंटाईन करण्यात आलं. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी पाऊल उचलत त्यांना लगेच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हवण्यात आलं. मी बीएमसीचे आभार मानतो की, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. एवढचं नाहीतर त्यानंतर बीएमसीच्या वतीने संपूर्ण सोसायटी व्यवस्थित सॅनिटाइज करण्यात आली. आम्हा सर्वांच्याही टेस्ट करण्यात आल्या असून आम्हा सर्वांच्या टेस्ट
नेगेटिव्ह आल्या आहेत. सध्या मी माझ्या आईला कोरोना टेस्टसाठी घेऊन जात आहे. मी प्रार्थना करतो की, माझी आईचा रिपोर्टही नेगेटिव्ह येईल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर खान लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर आमीर खान 15 जुलैपासून ‘लाल सिंह चड्ढा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटिंग पुन्हा सुरु करण्यासाठी उत्सुक होता. परंतु, त्याच्या स्टाफपैकी 7 लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आता चित्रपटाचं शुटिंग पुन्हा सुरु करण्यासाठी उशिर होऊ शकतो.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, जर बॉलिवूडबाबत सांगायचे झाले तर कोरोनाच्या संसर्गामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 मे रोजी प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांच्यातील वाजिद खान यांचा मृत्यू कोरोना आणि किडनी फेल्योरमुळे झाला होता. 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध निर्माते अनिल सूरी यांच्याही मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला होता. प्रसिद्ध अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, उपचारानंतर ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर अभिनेता वरुण धवनच्या अमेरिकेत राहणाऱ्या मावशीचं आणि निर्माता कुणाल कोहलीच्या आत्याचं अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान, करण जौहर, बोनी कपूर, अमृता अरोरा, सोफी चौधपी यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. टी-सीरीजच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारीही कोरोनाग्रस्त झाले होते. प्रसिद्ध गायिका कनिका कपूरही कोरोनाच्या विळख्यात अडकली होती. अभिनेता फ्रीडी दारूवालाचे वडिल आणि अभिनेत्री/गायिका मोनिका डोगरा यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. लंडनमध्ये शिफ्ट झालेला अभिनेता पूरब कोहली, त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली होती. आता हे चौघेही कोरोनामुक्त झाले आहेत.