बॉलिवूड अभिनेता राज बब्बर यांच्या मुलावर गोव्यात गुन्हा

0
994

गोवा, दि. ११ (पीसीबी) – भरधाव वेगाने कार चालवून एका स्कुटरला धडक दिल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरविरोधात गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोटार वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ वर्षाचा स्थानिक तरुण पाओलो कोरिया याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, ‘प्रतीक हे भरधाव वेगात गाडी चालवत होता. पोर्वोरीम पोलीस स्थानकाजवळील रस्त्यावर त्याने माझ्या दुचाकीला धडक दिली आणि मला व माझ्या बहिणीला धमकी दिली’ असे म्हटले आहे. तर, प्रतीकनेही तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून त्याने कारची काच फोडल्याचा आरोप केला आहे.