“बेवकूफ” या ऑनलाईन शॉपिंग साईटच्या प्रतिनिधीने ग्राहकाला घातला ३९ हजारांचा गंडा

0
474

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – बेवकूफ (www.bawakoof.com) या ऑनलाईन शॉपिंग साईटच्या कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने ग्राहक तरुणाला ३९ हजार ८३२ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १ ते ११ मे २०१९ दरम्यान घडली.

याप्रकरणी निकोल निलेश शर्मा (वय २, रा. बावधन, पुणे. मूळ रा. अकब, जि. रतलाम, मध्यप्रदेश) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेवकूफ या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून फिर्यादी निकोल याने पाच टीशर्ट मागवले. त्यातील चार टीशर्ट निकोल याला मिळाले. एक टीशर्ट मिळाला नसल्याने त्याने शॉपिंग साईटच्या कस्टमर केअरशी संपर्क केला. कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने त्यांना एक लिंक पाठवली. ती लिंक पुन्हा आलेल्या नंबरला रिसेन्ड करण्यास सांगितले. त्यानुसार निकोलने लिंक रिसेन्ड केली. निकोलच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन त्याआधारे निकोलच्या बँक खात्यातून तब्बल ३९ हजार ८३२ रुपये काढून घेतले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.