बेळगावजवळ भाजप आमदार पुत्राच्या भरधाव कारच्या धडकेत तरूणी ठार

0
656

पणजी, दि. ९ (पीसीबी) –  पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बेळगावजवळ गोव्यातील हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो यांच्या मुलाच्या भरधाव कारने  धडक दिल्याने एका पादचारी तरुणीचा जागीच  मृत्यू झाला. तर आणखी एक तरुणी जखमी झाली आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने कारवर दगडफेक करुन कार पेटवून दिली. सोमवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला.

तैनीयत वाहिद बिस्ती (वय १८) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तैनीयत ही मूळची बिस्ती गल्ली, कॅम्प, गोवा येथील राहणारी होती. सध्या आझादनगर तिसऱ्या क्रॉसजवळ ती राहत होती. तर या अपघातात सम्रीन खालीद बिस्ती (वय २०, रा. कॅम्प) ही तरुणी जखमी झाली  आहे. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

ही कार हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांच्या मुलाची आहे. ही बीएमडब्ल्यू कार बंगळुरुहून बेळगावमार्गे गोव्याला जात होती. ग्लेनसोजा टिकलो (वय २७, रा. कळंगुट, बार्देश, गोवा) या तरुण उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.