Pune Gramin

बेगडेवाडीत रेल्वेच्या धडकेने महिलेचा मृत्यू

By PCB Author

July 09, 2018

देहुरोड, दि. ९ (पीसीबी) – बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी पहाटे उघडकीस आली. या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.  महिलेचे वय अंदाजे पंचवीस वर्षे असून वर्ण गव्हाळ, उंची पाच फूट दोन इंच आहे. तिच्या अंगामध्ये गुलाबी रंगाचा स्वेटर, निळा टॉप त्यावर फुलपाखरांचे चित्र आणि लाल रंगाची पँट आहे.

दरम्यान या महिलेबाबत  कोणाला माहिती असल्यास त्यांनी त्वरीत देहूरोड रेल्वे पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.