बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर अटक

0
208

चाकण, दि. १० (पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाकडून एक देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वाचार वाजता आंबेठाण चौक, चाकण येथे करण्यात आली.

महेश बाळू पडवळ (वय 20, रा. बसोदरा, आंबेठाण, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस नाईक विठ्ठल बाजीराव सानप यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठाण चौकात एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आंबेठाण चौक परिसरात सापळा लावून आरोपी महेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना आरोपी महेश याच्याकडे नसल्याने पोलिसांनी त्याच्याकडून 51 हजारांचा ऐवज जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.