बॅडमिंटन वर्ल्ड चँपियनशिप: पी.व्ही. सिंधू सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

0
458

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने शनिवारी चीनच्या शेन युफेईचा २१-७, २१-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला व वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने सलग तिसऱ्यांदा महिला एकेरीच्या गटात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

सिंधूने प्रतिस्पर्धी युफेईला कुठलीही संधी न देता संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. रॅटचानोक इन्टानोन आणि नोझोमी ओखुरा यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. यांच्यातील विजेत्याशी अंतिम फेरीत सिंधूची गाठ पडेल.

काल पी. व्ही. सिंधूनेही ताइ यिंगचा १२-२१ २३-२१, २१-९ असा तीन सेटमध्ये पराभव करुन सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. पी. व्ही सिंधूने गेल्या वर्षी वर्ल्ड टूर फायनलमध्ये ताइवर तीन गेम्समध्ये मात केली होती.