बुर्डे वस्ती रस्त्याच्या ओढ्याला पूरस्थिती

0
326

आळंदी, दि. 4 (पीसीबी): बुधवार रात्री पासून चालु असणार्या मुसळधार पावसाने आळंदी जवळील बुर्डे वस्ती माळीपेठा कडील नैसर्गिक ओढ्याला पुरस्थीती आहे. तेथील स्थानिक नागरीक आणि शेतीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली असता अध्याप प्रशासनाने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नसल्याचे निदर्शनास आले. मुळात नैसर्गिक ओढा असल्याने तेथील पाण्याचा प्रवाह माती टाकून थांबल्यामुळे पूर्ण रस्त्यावर आणि नागरिकांच्या शेतात, घरात पाणी गेल्यामुळे स्थानिकांची गैरसोय आणि नुकसान झाले आहे. एकंदरीत प्रशासनाचा ढोबळ कारभार दिसून येत आहे.

स्थानिकांशी चर्चा करून संबंधीत महानगरपालिकेच्या अधिकार्यांना लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लवकरात लवकर काम पुर्ण होईल, अशी प्रतिक्रिया अधिकार्यांनी दिली आहे.