बुमराह, भुवनेश्वर कुमारला संधी द्यायला हवी होती – सुनील गावस्कर

0
506

मुंबई, दि.३ (पीसीबी) – भारत वि. वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघ नुकताच जाहीर करण्यात आला असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या दोघांना संघातून वगळण्यात आले आहे. याबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान ऑक्टोबर महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यावेळी निवड समितीने बुमराह, भुवनेश्वर कुमारसह काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. याच निवडप्रक्रियेवर सुनील गावस्कर यांनी एक लेख लिहून टीका केली आहे.

‘बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती हवी होती तर त्यांना एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत द्यायला हवी होती. या दोन्ही वेगवान गोलंदाजांची कसोटी सामन्यात भारतीय संघाला गरज आहे. ज्याअर्थी त्यांना वगळण्यात आले आहे त्याअर्थी निवड समिती कसोटी मालिकेला जास्त महत्त्व देत नाही’ अशा शब्दात गावस्करांनी आपली नाराजी व्यक्त केली.