Pune

बुधवार पेठेत महिलेवर अॅसिड हल्ला

By PCB Author

June 13, 2019

पुणे, दि. १३ (पीसीबी) – बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगमध्ये एका वेश्याव्यावसाय करणाऱ्या महिलेवर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने महिला यातून सुखरुप वाचली.

विष्णू गोपाल प्रमाणे (वय २०, सध्या रा. राजधानी हॉटेल, मुळ कोलकत्ता) असे या आरोपीचे नाव आहे.

महिला आणि आरोपी दोघांचे प्रेमसंबंध होते. महिलेने आरोपीचा मोबाईल घेतला होता त्यावरुन दोघांची भांडणे झाली. भांडणाच्या रागातुन आरोपीने महिलेवर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला मात्र, महिला जखमी झालेली नाही.